Untitled Document
call 0233 2211919   |    email miraj-mahavidyalayamiraj@gmail.com

Yashwant Shikshan Sanstha's

Miraj Mahavidyalaya, Miraj

Affilited to Shivaji University, Kolhapur - Code
Accredited by NAAC (3rd Cycle) with 'B+' Grade (CGPA 2.53)
 
Untitled Document

About College

 

।। ज्ञानम् परम् दैवतम्।।

यशवंत शिक्षण संस्था, सांगली (कुपवाड) संचलित

मिरज महाविद्यालय, मिरज

कला, वाणिज्य व विज्ञान

७९५ /१/अ, शासकीय दूध डेअरी शेजारी, दुधगांवकर मळा. मिरज. ४१६४१०


मिरज शहर आणि मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय व्हावी व त्यांना दर्जेदार शिक्षण देवून सक्षम बनवावे या उद्देशाने मिरज विधानसभा मतदार संघाचे माजी. आम. प्रा. शरद पाटील यांनी कला, विज्ञान व वाणिज्य विद्याशाखा असलेले महाविद्यालय जून १९९३ पासून शासन मान्यतेने सुरु केले. कला व विज्ञान या दोन विद्याशाखा असलेले महाविद्यालय हिंदुधर्मशाळेच्या आवारात सुरु झाले. सुरुवातीची काही वर्षे हिंदुधर्मशाळेच्या इमारतीत भौतिक गैरसोयी असूनही तरुण व उत्साही अध्यापकांनी विद्याथ्र्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न व प्रशासनाच्या सहकार्यामुळे अल्पावधीत हे महाविद्यालय नावारुपाला आले या महाविद्यालयातून कला व विज्ञान शाखांच्या पदव्या घेतलेले अनेक युवक युवती समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तमप्रकारे काम करत आहेत.


महाराष्ट्र शासनाने मिरज शहरातील बुधगांवकर मळा येथील साडे तीन एकर जमीन महाविद्यालयासाठी उपलब्ध करून दिली. त्या जमिनीवर संस्थेने कर्ज काढून इमारत बांधली व २००५ सालापासून स्वमालकीच्या दिमाखदार इमारतीत महाविद्यालयाचे कामकाज सुरु झाले.


देशातील शैक्षणिक महाविद्यालयांचे मुल्यांकन करणाऱ्या नॅक या संस्थेकडून सन २०१९ साली तिसऱ्या वेळेस पुनर्मुल्यांकन होऊन महाविद्यालयास 'B+' मानांकन मिळाले. प्रारंभीच्या काळात सुरू न होवू शकलेला वाणिज्य विभाग विद्यार्थ्यांच्या आग्रही मागणीमुळे सन २०१६-१७ पासून विनाअनुदान तत्वावर सुरु करण्यात आलेला आहे.




Untitled Document
 

e-Visitor counter
0000000000
 

© 2022 | Miraj Mahavidyalaya, Miraj - All Rights Reserved by Department Of Computer Science.
Design By - Dream Merchant Computers, Sangli